वांद्रे (मुंबई) येथून आणखी एका आतंकवाद्याला अटक !

‘आतंकवादी कारवायांच्या प्रकरणात एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच अटक का होते ?’, याचे उत्तर ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे म्हणणार्‍यांनी दिले पाहिजे ! घातपात घडवण्यासाठी कार्यरत असणारी आतंकवाद्यांची मोठी यंत्रणा देशासाठी घटक !

आरे वसाहत (मुंबई) येथे घराबाहेर आलेल्या महिलेवर बिबट्याचे आक्रमण !

२९ सप्टेंबरच्या सायंकाळी ७.४५ वाजता ही घटना घडली. बिबट्याच्या आक्रमणात निर्मलादेवी खाली पडल्या; मात्र त्यांनी हातातील काठी सोडली नाही. निर्मलादेवी यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचे प्राण वाचले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्राचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी ३ मासांनी वाढवला !

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण…

मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तातडीचे साहाय्य सर्वतोपरी पोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश !

मराठवाड्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली; मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत. शेतकर्‍यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

अतीवृष्टीमुळे ‘सीईटी’ परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्यात येणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

अतीवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोचू शकले नाहीत. यामुळे ‘सीईटी’ची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्यात येणार आहे.

सुकाणू समितीचे सदस्य प्रा. नितीन बानगुडे पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली गड आणि किल्ले यांच्या दुरवस्थेची माहिती !

गड आणि किल्ले यांची दुरवस्था लवकर दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी !

१ ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी १० रुपयांना देण्याचा शासनाचा निर्णय !

कोरोनाच्या कालावधीत गरीब आणि निराधार नागरिकांपैकी कुणी उपाशी राहू नये, यासाठी शासनाने शिवभोजन थाळी विनामूल्य देण्याचे घोषित केले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन याची समयमर्यादा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती

नजरकैदेत ठेवल्यास सचिन वाझे पळून जाण्याची शक्यता ! – अन्वेषण यंत्रणा

हृदयाचे शस्त्रकर्म झाल्यामुळे बरे होईपर्यंत त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याची मागणी वाझे यांनी विशेष न्यायालयाकडे केली आहे. याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने विरोध दर्शवला असून २७ सप्टेंबर या दिवशी न्यायालयाकडे त्यांनी वरील भूमिका मांडली आहे.

भाजपच्या उमेदवाराच्या माघारीमुळे हिंगोली येथील राज्यसभेची पोटनिवडणूक विनाविरोध होणार !

भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते अन् विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

परिवहनमंत्री अनिल परब यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून ८ घंटे चौकशी करण्यात आली !

अनिल परब म्हणाले, ‘‘अंमलबजावणी संचालनालयाकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत. मी कुणाला व्यक्तीगत उत्तरे देण्यास बांधील नाही.’’