केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश !

२ आठवड्यांत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश  !

अल्पवयीन आरोपीला प्रौढ आरोपी म्हणून दाखवणार्‍या पोलीस निरीक्षकाची चौकशी करा !

अशा पोलिसांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या गुन्ह्यांचे अन्वेषण केले, त्या सर्वच गुन्ह्यांचे न्यायालयाच्या निरीक्षणाखाली फेरअन्वेषण करून अशा खाकीतील खंडणीखोरांना कठोर शिक्षा केली, तरच इतरांना जरब बसेल.

डॉ. स्वामी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी ७ ऑक्टोबरला न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार !

देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !

मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघणार !

मानाच्या गणपति विसर्जन मिरवणुकीपूर्वी अन्य मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्याची अनुमती द्यावी, या मागणीसाठी प्रविष्ट केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघणार ! – न्यायालयाचा निकाल

मानाच्या गणपति विसर्जन मिरवणुकीपूर्वी अन्य मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास अनुमती द्यावी, या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे लक्ष्मी रस्ता येथून मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघेल, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

ग्राहकांनी मागितलेली माहिती सहकारी बँका आणि पतसंस्था यांनी देणे, हे त्यांचे कर्तव्यच !

जळगाव जिल्ह्यातील बँक असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात एक याचिका प्रविष्ट केली होती. त्यात त्यांनी ‘बँकिंग नियमन अधिनियमानुसार माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितल्यास ती देणे बंधनकारक नाही’, असे म्हटले होते. त्यावर न्यायालयात करण्यात आलेला युक्तीवाद, हिंदु विधीज्ञ परिषदेने प्रविष्ट केलेली हस्तक्षेप याचिका आणि त्यावर उच्च न्यायालयाने दिलेला निवाडा यांविषयीचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.

‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला !

आर्थिक अपव्यवहार प्रकरणात ‘अंमलबजावणी संचलनालया’ने (‘ईडी’ने) मागील वर्षी अनिल देशमुख यांना ११ घंट्यांच्या चौकशीनंतर अटक केली होती.

पुण्यातील मानाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आधी मानाचे ५ गणपति जातील, त्यानंतर लहान गणपति जाणार हे बंधनं का ?, असा प्रश्न अन्य गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आला होता. मानाच्या गणपतींच्या अगोदर छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची अनुमती द्यावी, अशी त्यांची मागणी होती.

नागपूर येथे नैसर्गिक पद्धतीने पूर्ण नष्ट होणार्‍या श्री गणेशमूर्तींनाच शासनाची अनुमती !

‘राज्यात नैसर्गिक पद्धतीने पूर्णपणे नष्ट होणार्‍या श्री गणेशमूर्तींनाच अनुमती दिली जाईल. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) श्री गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात येणार आहे, असे आगामी गणेशोत्सवाविषयी राज्यशासनाने तात्पुरते धोरण सिद्ध केले आहे.

अन्य गणेश मंडळांना विसर्जनासाठी पुण्यातील लक्ष्मी रस्त्याचा वापर करण्यावर असलेली बंधने अवैध ! – बढाई समाज ट्रस्ट

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाची ५ गणेश मंडळे गेल्यानंतरच अन्य मंडळांनी मार्गस्थ व्हावे, हा रूढी-परंपरा आणि प्रथेचा भाग, म्हणजे कायदा नाही.