पुण्यातील मानाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

अंनिसचे असीम सरोदे यांच्या माध्यमातून केली होती याचिका !

मुंबई – पुण्यातील मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. विसर्जन तोंडावर असतांना स्वैर याचिका करणे चुकीचे असल्याचे सरकारने न्यायालयात सांगितले. अन्य गणेशोत्सव मंडळांच्या वतीने ‘बढाई समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट केली होती.

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आधी मानाचे ५ गणपति जातील, त्यानंतर लहान गणपति जाणार हे बंधनं का ?, असा प्रश्न अन्य गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आला होता. मानाच्या गणपतींच्या अगोदर छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची अनुमती द्यावी, अशी त्यांची मागणी होती.

‘ऐन गणेशोत्सवाच्या काळात हा निर्णय देता येणार नाही’, असे म्हणत ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.