डॉ. स्वामी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी ७ ऑक्टोबरला न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार !

पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा न्यायालयीन लढा

नवी देहली – येत्या ७ ऑक्टोबर या दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम्  स्वामी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहेत. नवी देहली येथे या संदर्भात ११ सप्टेंबर या दिवशी कायदेतज्ञांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर डॉ. स्वामी यांनी हे घोषित केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम्  स्वामी

विधीज्ञ सत्या सब्रवाल आणि विधीज्ञ विशेष कोनोडीया यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबरला डॉ. स्वामी हे पंढरपूर येथे भेट देणार आहेत. यावेळी ते वारकरी संप्रदाय आणिव विठ्ठल भक्त यांची बैठकही घेणार आहेत.

संपादकीय भूमिका

देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !