Vitthal Mandir Water Leakage : पहिल्याच पावसाळ्यात पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गळती !
यावरून मंदिराचे जे संवर्धनाचे काम झाले, ते निकृष्ट होते, असाच विचार भाविकांच्या मनात येत आहे. यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांच्यातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
नाशिक येथील वालदेवी नदीत सहस्रो मासे मृत्यूमुखी !
इतकी गंभीर घटना वारंवार होऊन महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष कसे करते ? अशा कर्तव्यचुकारांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
आर्थिक फसवणूक झाल्याने शहापूर येथील शेतकर्यांचे उपोषण, दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी पसार !
दीड महिन्याचा कालावधी उलटूनही आरोपी पसार असल्याने अन्वेषणयंत्रणा अकार्यक्षम आहेत’, असा आरोप येथील शेतकर्यांनी केला आहे.
Injecting Cows For Smuggling : मध्यरात्री रस्त्यावर झोपलेल्या गायींना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांची तस्करी !
कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? पोलीस झोपले होते का ?
बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवलेले ९३ खेळाडू अद्यापही नोकरीत कार्यरत !
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांना आळा बसावा, यासाठी राज्य सरकारकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करणारे ‘अॅप’ निर्माण करण्यात येणार आहे; मात्र अद्यापही हे ‘अॅप’ चालू होऊ शकलेले नाही.
Maharashtra Danger Of flood : गाळउपशा अभावी महाराष्ट्रातील १५० नद्यांना पुराचा धोका !
प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे यापूर्वीही पुराच्या मोठ्या दुर्घटना घडून अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. यातून काहीही धडा न घेणे, हे प्रशासन निर्ढावले असल्याचे द्योतक आहे !
काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारे ४ सरकारी कर्मचारी बडतर्फ !
अशांची भरती करणार्या आणि त्यांना एवढे दिवस पदावर राहू देणार्या संबंधितांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
खोट्या आरोपाखाली अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना भोगावा लागला होता कारावास !
२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कारावासातील अनुभवामुळे ईश्वरावरील श्रद्धा वृद्धींगत, दुखावलेल्या अधिकार्यांकडून अडकवण्याचा प्रयत्न’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (उत्तरार्ध)
‘सीबीआय’ने षड्यंत्रात गोवलेले विक्रम भावे !
वर्ष २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली. या प्रकरणात आरोपी केलेल्या अधिवक्ता संजीव पुनाळेकर, विक्रम भावे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची पुण्याच्या विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाने १० मे या दिवशी निर्दाेष मुक्तता केली. या पार्श्वभूमीवर ‘आकार डीजी-९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे आणि या खटल्यातील अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याशी संवाद साधला. त्यातील श्री. विक्रम भावे यांचे अनुभव वाचकांसाठी देत आहोत.