पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात शहरातील ४५ रस्ते विकसित करण्यासाठी फक्त १० कोटी रुपयांचे प्रावधान !

वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी असंवेदनशील असणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

पिंपरीतील (पुणे) २ अनधिकृत शाळांवर गुन्हा नोंद !

लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल’चे श्रेयकुमार यांच्या विरोधात, तर ‘ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल’चे जे. डीकोस्टा आणि समीर गोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

पुणे येथे ३ लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक सेवेतून बडतर्फ !

पोलिसांनी लाच मागणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय !

वेंगुर्ला बसस्थानकातील प्रसाधनगृह पुन्हा चालू !

एका सामाजिक संस्थेला असे करावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! सामाजिक संस्थेला जे जमते ते नगरपालिका आणि नगर परिषद यांना का जमत नाही ? तेथे निवडून येणार्‍यांना याची लाज वाटली पाहिजे !

अस्वच्छता आणि लूट यांमुळे पैठण परिसरात दशक्रिया विधीचे प्रमाण निम्म्याने घटले !

दशक्रिया विधीच्या ठिकाणी अस्वच्छता ठेवून सुविधा न देणार्‍या प्रशासनाने हिंदु धर्मियांनी वेळीच खडसवायला हवे !

गोवा : ‘किलबिल’ पुस्तकात ‘मराठी’ शब्दाचे ‘स्पेलिंग’ चुकले !

जेव्हा अशा ढोबळ चुका रहातात, तेव्हा पुस्तक निर्मिती समिती आणि मुद्रितशोधन करणारे तज्ञ यांना उत्तरदायी ठरवून समितीतून काढून टाकले पाहिजे, असे सर्वसामान्य लोकांना वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

पुणे येथील येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा बंदीवान पसार !

कारागृहातून बंदीवान पसार झाला कि पसार होऊ दिला, हे पहाणे आवश्यक !
कारागृहातून बंदीवान पसार होणे, हे कारागृह प्रशासनाला लज्जास्पद आहे.

पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्. बसमुळे ६ महिन्यांत ३४ अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू !

अधिकार्‍यांनी केवळ अपघातांची माहिती न देता ते होऊ नयेत; म्हणून काय उपाययोजना करणार, ते सांगितले पाहिजे.

Cancelled Free Travel For Women : कर्नाटकात काँग्रेस सरकारला परवडेनाशी झाली आहे महिलांसाठीची विनामूल्य बस प्रवासाची योजना !

बसच्या भाड्यात २० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव ! केंद्र सरकारने आता कायदा करून अशा प्रकारच्या योजनांवर बंदी घातली पाहिजे !

पनवेल आणि खारघर परिसरात कोयता बनियन टोळी सक्रीय !

खारघर वसाहतीलगत असणार्‍या पेठ गावात १० जुलै या दिवशी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियनधारी टोळीतील चौघे जण फिरतांना सीसीटीव्हीमध्ये दिसले. या दिवशी त्यांनी अनेक घरांत चोर्‍या केल्या.