डोंबिवली शहराजवळील खाडीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा !

मोठागाव, कोपर भागात, देवीचा पाडा, मेंग्या बाबा मंदिर येथे दिवस-रात्र अवैध रेती उपसा प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे. उल्हास खाडीतून तब्बल १० ते १२ सक्शन पंपांच्या साहाय्याने हा उपसा होत आहे.

राज्यातील आरोग्यव्यवस्था मृत्यूपंथाला ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

शासकीय रुग्णालयांना ‘हाफकीन’कडून औषध घेण्यास सांगितले आहे; मात्र त्यांना खरेदीसाठी निधीच दिलेला नाही. त्यामुळे एकूणच राज्यातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती मृत्यूपंथाला लागल्यासारखी आहे

वर्दळीच्या अनेक रेल्वेस्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नियुक्त नसल्याने सुरक्षाव्यवस्था वार्‍यावर !

रेल्वेस्थानकावर पोलीस कर्मचारी नसणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी एक प्रकारचा खेळच आहे. कर्मचार्‍यांना नियुक्त करण्यामध्ये हलगर्जीपणा करणारे दायित्वशून्य अधिकारी काय कामाचे ?

Boycott Sunburn : ‘सनबर्न’ला पर्यटन खात्याची अनुमती; मात्र ३१ डिसेंबरला ‘सनबर्न’ नाहीच !

सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?

शासन अध्यादेश आणि परिपत्रक यांना उशीर होण्यामागील कारणमीमांसा

‘प्रशासनाकडून अत्यंत छोट्या कामांकरता विनाकारण अडवणूक वा वेळकाढूपणा केला जातो, केवळ एका स्वाक्षरी करण्यासाठी ६ मास वाट पहावी लागते. अशा प्रशासकीय अधिकार्‍यांवर ‘सेवा कायद्या’नुसार वेळेतच कारवाई करणे आवश्यक आहे’, अशी मागणी अनेक आमदारांनी केली आहे.

भूमाफियांनी सरकारची भूमी लाटल्याचा प्रकार उघड, महसूल विभागाची पुनर्रचना करण्याची उपाययोजना !

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील म्हारळ येथील संरक्षण विभागासाठी सरकारने ७० हून अधिक शेतकर्‍यांकडून ८३ एकर भूमी घेतली. या भूमीवर प्रकल्प झाला नसल्याचे लक्षात आल्यावर या शेतकर्‍यांपैकी २१ जण आणि या भूमीशी संबंधित नसलेल्या काही लोकांनी एकत्र येऊन सरकारकडून १ वर्षासाठी कसण्यासाठी घेतली.

पुणे येथे नदीपात्रात कचरा टाकल्याने फटाका स्टॉलधारकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई !

आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

महाराष्‍ट्रात गुटखाबंदी केवळ कागदावरच आहे का ?

देश महासत्तेकडे वाटचाल करत असतांना सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. गुटखा तस्‍करी आणि विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई आवश्‍यक आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मंदिराला निधी न देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्‍वर मंदिरा’साठी राज्य सरकारकडून प्रत्येक मासाला केवळ ५०० रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला जात आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांत सुविधांअभावी आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा !

नागपूर येथे ७ डिसेंबरपासून चालू झालेल्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक प्रश्न आरोग्य विभागाचे असतात. वारंवार मागणी करूनही शासकीय रुग्णालयांतील प्रश्न ‘जैसे थे’ रहात असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांतील आमदार हतबल झाल्याचे दिसून आले.