पिंपरी (जिल्हा पुणे) – शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम आणि अटी यांची पूर्तता न करता शाळा चालू ठेवल्या. शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत त्यांच्याकडून शैक्षणिक शुल्क वसूल केले. विद्यार्थ्यांचे दाखले आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे कह्यात घेऊन शासन, विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक केली. या प्रकरणी ‘लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल’ आणि ‘ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल’ या २ अनधिकृत शाळांवर गुन्हा नोंद केला आहे.
‘लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल’चे श्रेयकुमार यांच्या विरोधात, तर ‘ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल’चे जे. डीकोस्टा आणि समीर गोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.