विधान परिषदेत जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी विविध प्रश्नांवरून मंत्री आणि आमदार यांच्यात अनावश्यक वाद !

गोंधळातच महत्त्वाच्या विधेयकांसह पुरवणी मागण्या संमत झाल्या. विधानसभा आणि विधान परिषद येथे मराठवाडा अन् विदर्भ यांवरील चर्चा अपूर्ण राहिली.

तुर्भे-वाशी रस्त्यावरील ‘सर्व्हिस रोड’वर अनेकविध समस्या !

नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष न देणार्‍या प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?

गुरुग्राम (हरियाणा) येथे मोकळ्या जागेवर नमाजपठण करणार्‍यांना हिंदु संघटनांनी हाकलले !

मोकळ्या जागेवर विनाअनुमती नमाजपठण करण्याचे धाडस होतेच कसे ? पोलीस आणि प्रशासन झापलेले असते का ? हिंदु संघटनांना अशा प्रकारे विरोध का करावा लागतो ?

महाराष्ट्रात नाताळ आणि ३१ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजल्यानंतरही मद्यविक्रीस सरकारची अनुमती !

त्यामुळे मद्याला विरोध करणार्‍या लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या तिन्ही दिवशी मध्यरात्रीनंतर मद्याची दुकाने उघडी रहाणार असल्यामुळे मद्यप्रेमींचा धुडगूस आणि ध्वनीप्रदूषण शहरात पहायला मिळणार आहे.

नाशिक येथील सरकारवाडा, मालेगाव किल्ला आणि सुंदरनारायण मंदिर, तर जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांमध्ये अतिक्रमण !

इतके अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यातील उत्तरदायींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे !

आदिवासी असल्याच्या बनावट दाखल्याने ३ सहस्र ८८९ जणांची शासकीय नोकरीत घुसखोरी !

एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट दाखले कोण देते ? तसेच शासकीय नोकरीत घुसखोरी होतेच कशी ? यातून शासकीय कारभार कसा चालला आहे, हे लक्षात येते. असे करणार्‍यांनाही कठोर शिक्षा द्यायला हवी !

मीरा-भाईंदर महापालिकेकडून वर्षानुवर्षे रखडलेल्या ‘तसलमात’च्या ६९ लाख रुपयांची वसुली !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चा दणका !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविषयी भाजपचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्याकडून अरेरावीची भाषा !

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तालिका सभापतींनी १५ मिनिटांसाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित केले.

२ मासांत चौकशी करून दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कोयना धरणासाठी विस्थापित झालेल्यांना अजूनही जमिनीचे वाटप झालेले नाही. त्यातच सोलापूर येथील एका अधिकार्‍याने काही प्रकल्पग्रस्तांना एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे समोर आले आहे.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमण हटवण्याची लिंगायत संघटनांची मागणी !

महापालिका प्रशासनाला ड्रेनेजचे पाणी आणि अतिक्रमण दिसत नाही का ? ‘प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?