सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ८ सहस्र विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी !

निकालामध्ये चुका का राहिल्या आहेत, हे विद्यापिठाने सांगायला हवे. यामध्ये दोषी असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. काही केले तरी यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाची हानी कधीही भरून निघणार नाही.

तीन दिवसांत वीजदेयक सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात आंदोलन करणार ! – अतुल भातखळकर, भाजप

महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीजदेयकांच्या सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, अशी चेतावणी भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिली आहे.

डिचोली परिसरात नरकासुर प्रतिमांच्या सांगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा

खरेतर रस्त्यावर प्रतिमा जाळण्यावरच बंदी घालून ती कृती रोखायला हवी होती. प्रशासनात ते करण्याचे धाडस नाही, तर निदान दुसर्‍या दिवशी रस्ते तरी स्वच्छ करायचे होते ! नरकासुरवृत्ती जोपासणारे प्रशासन काय कामाचे ?

प्रशासनाच्या विरोधात साईप्रसाद कल्याणकर यांचे लाक्षणिक उपोषण

तालुक्यातील बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या ३२ एकरातील बांधकामासाठी बिनशेतीची अनुमती घेतली नसतांना ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, नगर रचनाकार सिंधुदुर्ग यांच्याकडून हे अवैध बांधकाम होत असतांना कानाडोळा केला जात आहे.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नेहमी लोकशाहीच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष यांवर मौन का बाळगून आहेत ? बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्यांमुळे त्यांना आनंद मिळतो का ?

घोटाळ्याचा आरोप असणार्‍या बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे त्यागपत्र

शिक्षणमंत्रीपद जनता दल (संयुक्त)चे डॉ. मेवालाल चौधरी यांना देण्यात आले होते; मात्र त्यांच्यावर साहाय्यक प्राध्यापक नियुक्तीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप असल्यामुळे टीका होऊ लागली. त्यामुळे डॉ. चौधरी यांनी दोनच दिवसांत त्यांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे.

(म्हणे) ‘सरकार लक्ष ठेवणार !’ मुळात सरकार आहे का ? सेन्सॉर बोर्ड असून हिंदूंच्या देवतांचे विडंबन होते, मंदिरांचे सरकारीकरण होतच आहे, कायदा असून गोहत्या होतच आहेत !

​‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ आदी ओटीटी अ‍ॅप्स, तसेच ‘ऑनलाईन न्यूज पोर्टल्स’ यांवर आता केंद्र सरकार लक्ष ठेवणार आहे.’

भोगावती नदीला दूषित पाणी, मृत माशांचा खच

भोगावती नदीला दूषित पाणी आल्याने नदीपात्रात मासे मृत्यूमुखी पडू लागले आहेत.

आरोपी राजीव सक्सेना याने घेतले काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि सलमान खुर्शिद यांचे नाव !

ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील आरोपी राजीव सक्सेना यांनी चौकशीमध्ये काँग्रेसच्या नावांचा उल्लेख केला आहे.

घोटाळ्याचा आरोप असणारे मेवालाल चौधरी यांना केले बिहारचे शिक्षणमंत्री !

भाजपचे तारकिशोर प्रसाद केवळ १२ वी शिकलेले आहेत व त्यांना अर्थ खात्यासारखे महत्त्वाचे खाते दिल्याने सरकारवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.