गुरुग्राम (हरियाणा) येथे मोकळ्या जागेवर नमाजपठण करणार्‍यांना हिंदु संघटनांनी हाकलले !

नमाजपठणासाठी आलेले मुसलमान

गुरुग्राम (हरियाणा) – येथील सेक्टर-६९ मध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत शुक्रमार, २३ डिसेंबर या दिवशी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांनी विरोध केला. त्यांनी नमाजपठणासाठी आलेल्या मुसलमानांना हाकलून लावले. या वेळी पोलीस घटनास्थळी पोचले होते. काही मासांपूर्वी येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणावरून वाद झाला होता. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

हिंदु संघटनांनी आरोप केला की, येथे बाहेरून शेकडो लोकांना बोलवून नमाजपठण केले जाते. हिंदूंच्या विरोधात मोठे षड्यंत्र रचण्यात येते. येथे ‘भूमी जिहाद’ केला जात आहे. आम्ही येथे १५ वर्षांपासून रहात आहोत. येथे नंतर थडगे बांधून मुसलमान सांगतील ‘हे थगडे २५ वर्षांपूर्वीपासूनचे आहे.’  येथील मोकळी जागा नमाजपठणासाठी देण्यात आलेली नही. राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी यापूर्वीच ‘मोकळ्या जागेवर कुणीही नमाजपठण करू शकत नाही’, असा आदेश दिला आहे. तरीही मुसलमान येथे नमाजपठण करण्यासाठी येत आहेत.

संपादकीय भूमिका

  • मोकळ्या जागेवर विनाअनुमती नमाजपठण करण्याचे धाडस होतेच कसे ? पोलीस आणि प्रशासन झापलेले असते का ? हिंदु संघटनांना अशा प्रकारे विरोध का करावा लागतो ? हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती असू नये, असेच हिंदूंना वाटते !