मणीपूरमध्ये राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा लागू करा ! – ‘कोकोमी’ची पंतप्रधानांकडे मागणी

इंफाळ (मणीपूर) – ‘कॉऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणीपूर इंटेग्रिटी’ (कोकोमी) या इंफाळस्थित संघटनेने मणीपूरमध्ये अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या अवैध स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी राज्यात ‘एस्.आर्.सी.’ (राष्ट्रीय नागरिकता कायदा) लागू करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मणीपूरमधील प्रशासन व्यवस्था पालटू नये. तसेच कुकींसाठी स्वतंत्र प्रशासन व्यवस्था उभारण्याची अनुमती देऊ नये, असे पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

केंद्र सरकारने ‘कुकी-झोमी सस्पेंशन ग्रुप्स’च्या काही नेत्यांसह विदेशी घटकांची  ओळख पटवून त्यांना म्यानमारला परत पाठवून द्यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारमधून आलेल्या स्थलांतरितांचा हात असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !