उदयनिधी स्टॅलीन, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

वर्धा आणि वणी (यवतमाळ) शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

वणी येथे पोलिसांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ 

वर्धा, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी २० ऑक्टोबर या दिवशी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्यासह महाराष्ट्रातील राष्ट्र्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. त्यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’चा (द्वेषपूर्ण वक्तव्याचा) गुन्हा नोंदवा’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली.

ही तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पुंडकर यांनी स्वीकारली. याप्रसंगी सर्वश्री भाजपचे नेते कमल कुलधरिया, जगदीश टावरी, हिंदु जनजागृती समितीचे दीपक जमनारे, नरेंद्र देशपांडे, पुरुषोत्तम हरणे, सनातन संस्थेचे शशिकांत पाध्ये, सौ. विजया भोळे आदी उपस्थित होत्या.

वरील स्वरूपाची तक्रार वणी (यवतमाळ) येथे हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली. वणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे  यांनी लेखी तक्रार स्वीकारली. पोलिसांनी कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी राजस्थानी ब्राह्मण मंडळ सदस्य संजय पांडे, श्रीराम आरती भक्त मंडळाचे कल्याण पांडे, हिंदु जनजागृती समितीचे लहू खामणकर, गुरुदेव सेवा मंडळाचे मनोहर झाडे, भाजप व्यापार आघाडीचे अनुराग काठेड, तक्रार स्वीकारतांना ठाणेदार अजित जाधव, सनातन संस्थेचे वामन मत्ते, गुरुदेव सेवा मंडळाचे नानाजी बदखल, हिंदु जनजागृती समितीचे लोभेश्वर टोंगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशांत परांडे, सकल हिंदु समाजाचे नरेश निकम उपस्थित होते.

निवेदन देण्यासाठी जमलेले हिंदुत्वनिष्ठ