नवरात्रोत्सवात देवतांचे विडंबन रोखण्यासाठी सार्वजनिक मंडळांना सूचना द्यावी !

लांजा येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने प्रशासनाला निवेदन

देवीदेवतांचे विडंबन रोखण्यासाठी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने प्रशासनाला निवेदन

लांजा – नवरात्रोत्सवात होत असलेले देवीदेवतांचे विडंबन रोखण्यासाठी सार्वजनिक मंडळांना सूचना द्यावी, अशी विनंती येथील ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने एका निवेदनाद्वारे प्रशासनाला करण्यात आली. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रमोद कदम यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी सकल हिंदु समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की,  

सध्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लांजा तालुक्यामध्ये विविध मंडळांकडून सार्वजनिक दांडियांचे आयोजन केले आहे. दांडियामध्ये हिंदु धर्मियांचे देवीदेवता, संत, राष्ट्रपुरुष किंवा सैनिक यांची वेशभूषा करून दांडिया खेळला जातो. त्यामुळे विडंबन होऊन आम्हा हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. तरी अशा प्रकारची वेशभूषा करून विडंबन रोखण्यासाठी मंडळांना सक्त सूचना द्यावी, अशी नम्र विनंती आहे.