हिंदुत्वनिष्ठांकडून कोल्हापूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार

कोल्हापूर – सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग आदी रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलीन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा) गुन्हा नोंदवा, अशी तक्रार ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर या दिवशी दिली. ही तक्रार पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी स्वीकारली.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप आणि सौ. निलांगी राहुल पाटील, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. अमर जाधव, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते. या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिले.
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती