इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १९ फेबु्रवारी – दळणवळण बंदी काळातील वीजदेयके पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. याची कोणतीच नोंद न घेता काही दिवसांपासून महावितरणने प्रलंबित वीजदेयक ग्राहकांची विद्युत् जोडणी तोडण्याची मोहीम चालू केली आहे. याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी महावितरण कार्यालय फोडले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्व कर्मचार्यांना कार्यालयाच्या बाहेर काढून काचेचे आणि अन्य साहित्य फोडले. यानंतर कार्यालयाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.