‘श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसा’ची हडप केलेली ३० कोटी रुपयांची भूमी पुन्हा देवस्थानाला मिळणार !
या आदेशामुळे महसूल विभागाला दणका बसला. अमरावतीच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी प्रकरणाचे अधिक सखोल अन्वेषण करून पुन्हा सुनावणीचे निर्देश दिले.
या आदेशामुळे महसूल विभागाला दणका बसला. अमरावतीच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी प्रकरणाचे अधिक सखोल अन्वेषण करून पुन्हा सुनावणीचे निर्देश दिले.
मंदिर महासंघाने चांगले कार्य हाती घेतले आहे. सर्वांनी मिळून शासनावर हिंदुहिताचे कायदे व्हावेत, यासाठी दबाव निर्माण करू शकतो.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी ‘मार्तंड देवस्थान समिती’च्या विश्वस्तांची भेट घेत महासंघाच्या कार्याची माहिती दिली.
२१ मार्च या दिवशी विष्णुप्रतिभा बँक्वेट सभागृह, उत्कर्ष विद्यालयासमोर, विरार (प.) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आरंभ सकाळी ९.३० वाजता होईल.
या अधिवेशनामध्ये मंदिरे सनातन धर्म प्रचाराची केंद्रे बनवणे, मंदिरांचे पावित्र्य राखणे, मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, मंदिरांच्या भूमींवरील अतिक्रमणे हटवणे, वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या भूमी बळकवणार्यांवर प्रतिबंध करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.
जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम यांना श्रीफळ अर्पण !
जर कुणी ठोकून काढण्याची भाषा करत असेल, तर वेळप्रसंगी त्याच भाषेत उत्तर देण्याची आमची क्षमता आहे, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही पत्रकार परिषद १५ मार्चला पार पडली.
खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले. ते करण्यात आले, तेव्हाच ‘पुढे ८ ते १० वर्षे त्याला काही होणार नाही’, असे सांगण्यात आले होते. असे होते, तर ४ वर्षांपूर्वीच लेपन केलेले असतांना ते परत परत का करावे लागते ?
अधिवेशनात जिल्ह्यातील ६ तालुक्यांतून, तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा (दोंडाईचा) येथूनही जवळपास ९० हून अधिक मंदिरांचे १५० हून अधिक विश्वस्त, अर्चक, पुरोहित, सेवेकरी उपस्थित होते.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न करता निर्णय देणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी. अशा दोषी अधिकार्यांना शिक्षा होण्यासाठी ‘ॲन्टी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ची आवश्यकता आहे, असे मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.