(म्हणे) ‘ जशी हिंदु महिलांची ‘मंगळसूत्र’ ही ओळख आहे, तशीच मुसलमान महिलांची ‘हिजाब’ ही ओळख आहे !’ – काँग्रेसचे खासदार टी.एन्. प्रतापन्

कशाची तुलना कशाशी करावी, हेही न समजणारे प्रतापन ! अशी तुलना करून ते महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याचे समर्थन करू शकत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !

मराठा आरक्षणासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर

लोकसभेमध्ये ९ ऑगस्ट या दिवशी मराठा आरक्षणासंबंधी विधेयक मांडण्यात आले. विधेयकात ३३८ ब आणि ३४२ अ या अंतर्गत काही सुधारणा होणार आहेत. हे विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर राज्यसभेत मांडले जाणार आहे.

गेल्या ३ वर्षांत पोलीस कोठडीमध्ये ३४८ जणांचा मृत्यू ! – केंद्र सरकार

या मृत्यूंमागे नेमकी कोणती कारणे होती, जर अत्याचारांमुळे हे मृत्यू झाले असतील, तर संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, याचीही माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यायला हवी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती थांबवण्याविषयी पंतप्रधान मोदी यांना सावरकरप्रेमींनी लिहिलेले पत्र

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपकीर्त करणार्‍या व्यक्तींना सध्याच्या भारतीय दंड संहितेत देशद्रोहाला दिल्या जाणार्‍या शिक्षेची जितकी तरतूद आहे, तितकी कडक शिक्षा दिली जावी.

लोकसभेमध्ये केवळ १५ खासदारांचीच उपस्थिती १०० टक्के

आता संसदेत उपस्थित रहाण्यावरूनच या लोकप्रतिनिधींना वेतन आणि अन्य भत्ते दिले पाहिजेत. विनाकारण अनुपस्थित रहणार्‍यांकडून दंडही वसूल केला पाहिजे !

खासदार स्थानिक क्षेत्र योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खासदाराला प्रतिवर्षी दिल्या जाणार्‍या ५ कोटी रुपयांचा योग्य विनियोग होतो का ?

लोकसभेतील ५४२ खासदार आणि राज्यसभेतील अनुमाने३०० खासदार यांच्यासाठी प्रत्येकी ५ कोटी, म्हणजे सहस्रो कोटी रुपये व्यय होतात. या निधीचे नियोजन कसे होते ? योजना चालू करण्याचा उद्देश यशस्वी होतो का ?

जगातील कोणत्याही देशाच्या सरकारने शेतकरी आंदोलनाचे समर्थन केलेले नाही ! – केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण

कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि काही युरोपीयन देशांमध्ये भारतीय कृषी कायद्यांविषयी काही ‘प्रेरित’ भारतीय वंशाच्या व्यक्तींनी या कायद्यांना विरोध केला आहे.

संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचा विचार नाही ! – केंद्र सरकार

केंद्रातील सरकार जर असा कायदा करणार नसेल, तर हिंदूंचे विविध मार्गांनी होणारे धर्मांतर कोण रोखणार, याचे उत्तर कोण देणार ?

आयकरामध्ये कुठलीही नवीन सुट नाही !

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. प्रथमच ‘पेपरलेस’ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यासाठी  सीतारामन् यांच्याकडून ‘मेक इन इंडिया’ ‘टॅब’चा वापर करण्यात आला.

अमली पदार्थांच्या विळख्यात भारतातील भावी पिढी !

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील १० ते १७ वयोगटांतील १ कोटी ४८ लाख मुले अल्कोहोल, अफीम, कोकेन, भांग यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे.