मणीपूरच्या प्रकरणावरून संसदेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित !

सरकार चर्चेस सिद्ध असतांनाही विरोधी पक्षांकडून गदारोळ !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या २१ जुलै या दिवशी मणीपूरच्या घटनेवरून विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी १२.३० वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज २.३० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत ‘मणीपूरच्या महिलांना विवस्त्र करण्याच्या घटनेवर चर्चा करण्यात येईल’, असे सांगितले; मात्र तरीही विरोधक गदारोळ करत होते. मणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणी चर्चेसाठी काँग्रेसने ‘स्थगन प्रस्तावा’ची सूचना सादर करून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

यावरून विरोधी पक्षांना मणीपूरच्या घटनेविषयी सुख-दुःख नाही, तर त्यांना यावरून  राजकारण करून सरकारला जाणीवपूर्वक वेठीस धरायचे आहेत, असेच दिसून येते !