संसदेत अविश्‍वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून चर्चा

नवी देहली – मणीपूरमधील हिंसाचारावरून संसदेत १ ऑगस्ट या दिवशीही विरोधी पक्षांनी गदारोळ घातल्याने राज्यसभा आणि लोकसभा यांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. मणीपूरच्या सूत्रावर विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्‍वास प्रस्तावावर येत्या ८ ते १० ऑगस्ट या काळात चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेवर पंतप्रधान मोदी १० ऑगस्ट या दिवशी उत्तर देतील, असे सांगण्यात आले.