लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याची दिशा पालटली होती ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकमान्य टिळक हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे.या पुरस्कार मिळाल्याने मी उत्साहित आणि भावूक झालो आहे.

लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण हे देशवासियांना नेहेमीच प्रेरणा देत राहील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन १ ऑगस्ट या दिवशी सन्मानित करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

लोकमान्‍य टिळक : एक अलौकिक हिंदु नेते !

‘छत्रपती शिवरायांनी घेतलेली हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापनेची शपथ आणि त्‍यांनी निर्माण केलेले हिंदवी स्‍वराज्‍य आपल्‍या बांधवांच्‍या स्‍मृतीतून नष्‍ट होऊ नये, तसेच शिवरायांना समोर ठेवून आपल्‍या बांधवांनी देश स्‍वतंत्र करण्‍यासाठी लढा द्यावा’, हा हेतू मनात धरून हे दोन्‍ही उत्‍सव साजरे करण्‍याचा प्रयत्न लोकमान्‍य टिळक यांनी केला.

मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांच्‍याकडून लोकमान्‍य टिळक यांना अभिवादन !

लोकमान्‍य टिळक यांच्‍या जयंतीनिमित्त २३ जुलै या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्‍यांच्‍या वर्षा या निवासस्‍थानी आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांच्‍या शासकीय निवासस्‍थानी लोकमान्‍य टिळक यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करून अभिवादन केले.

‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार देण्यावरून वाद निर्माण !

‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्‍य टिळक’ राष्‍ट्रीय पुरस्‍कार घोषित !

‘लोकमान्‍य टिळक स्‍मारक ट्रस्‍ट’च्‍या वतीने देण्‍यात येणारा ‘लोकमान्‍य टिळक’ राष्‍ट्रीय पुरस्‍कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. ‘टिळक स्‍मारक ट्रस्‍ट’चे विश्‍वस्‍त डॉ. रोहित टिळक यांनी १० जुलै या दिवशी झालेल्‍या पत्रकार परिषदेत या पुरस्‍काराची घोषणा केली.

गणेशोत्सवातून लोकमान्य टिळक यांचा हेतू साध्य होण्यासाठी जनजागृती करूया ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्यांनी हिंदूंचे संघटन केले. हा उद्देश गणेशोत्सव मंडळांनी लक्षात घ्यावा !

लोकमान्य टिळक जन्मभूमीचे  संवर्धन करा !

पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने २० नोव्हेंबर २०२१ या दिवशी समितीच्या पत्रकार परिषदेत केली होती. सविस्तर वृत्त पहा …

काँग्रेसच्या राहुल गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील आरोप हे बुद्धीभ्रष्टतेचे लक्षण !

स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना क्षमेचे पत्र लिहिले होते’, असे सावरकरद्वेषी विधान काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वाशिम येथे ‘भारत जोडो’ यात्रेत केले.

अकोला येथे लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते अनावरण !

राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्दशेकडे कानाडोळा करणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !