गणेशोत्सवातून लोकमान्य टिळक यांचा हेतू साध्य होण्यासाठी जनजागृती करूया ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

सुधीर मुनगंटीवार

मुंबई – यावर्षी गणेशोत्सव हा नवीन संकल्पनेत साजरा करायचा आहे. लोकमान्य टिळक यांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव चालू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. २५ मे या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबईतील गणेशोत्सवाच्या पूर्व सिद्धतेविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार आशिष शेलार यांसह प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करतांना मूर्ती सिद्ध करणे, मूर्तींचे विसर्जन, मूर्ती सिद्ध करण्यासाठी जागा देणे याविषयाची नियमावली महानगरपालिकेने सिद्ध करावी. रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकाच्या व्यतिरिक्त आरती करतांना सर्वांनी एकत्रितपणे विचार करून निर्णय घ्यावा. कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याविषयी पोलिसांनी दक्ष असावे.

संपादकीय भूमिका

  • सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्यांनी हिंदूंचे संघटन केले. हा उद्देश गणेशोत्सव मंडळांनी लक्षात घ्यावा !