कुंभमेळ्यातील संतांच्या व्यवस्थेसाठी विशेष समितीची स्थापना ! – बंशीधर भगत, शहरविकास मंत्री, उत्तराखंड

कुंभमेळ्यामध्ये येणार्‍या संतांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, यासाठी विशेष समिती बनवण्यात आल्याचे शहरविकास मंत्री बंशीधर भगत यांनी घोषित केले.

हरिद्वारमध्ये लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करणार ! – मुख्य वैद्यकीय अधिकारी

कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कुंभमेळा परिसरात लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संभूकुमार झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

धर्मकार्यासाठी तुमची निवड होणे ही भाग्याची गोष्ट ! – स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती

हे राष्ट्रच नाही, तर स्वर्ग आणि ग्रह यांठिकाणी जेथे धर्माचे पालन होत नसेल, तेथेही आपण धर्मपालन करण्यासाठी प्रयत्न कराल, असा विश्‍वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.  

कुंभमेळा भारताची सांस्कृतिक महानता दर्शवतो ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की, विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर आलेल्या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन अन् नाशिक येथील गंगा नदीसह अन्य नद्यांमध्ये दिसून आला आहे.

कुंभमेळ्याला येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावाच लागणार !

कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

हरिद्वार येथील विविध प्रभागांंमध्ये अस्वच्छतेसह डासांचा उपद्रव

हिंदूंच्या पवित्र कुंभमेळ्याच्या वेळीही हरिद्वारमध्ये अस्वच्छता असेल, तर अन्य वेळी किती अस्वच्छता असेल, याचा विचारच न केलेला बरा ! तेथे आरोग्य आणि स्वच्छता विभाग आहे कि नाही, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

हरिद्वार कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची आरोग्य मंत्रालयाची चेतावणी !

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हरिद्वार येथील कुंभमेळ्याच्या काळात कोरोनाचा उद्रेक होण्याची चेतावणी दिली आहे. येथे प्रतिदिन १० ते १२ स्थानिक नागरिक आणि १० ते २० भाविक कोरोनाबाधित झाल्याचे आढळून येत आहेत.

कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या दिवशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष मार्गिका

आपत्कालीन वाहनांना ये-जा करण्यासाठी डेहरादून ते हरिद्वारपर्यंत विशेष मार्गिका (ग्रीन कॉरिडोर) उपलब्ध करून देण्यात येणार आहे

कुंभमेळ्यासाठी १२० कोटी रुपयांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या हस्ते लोकार्पण

कोरोनामुळे कुंभमेळा कसा होणार ? याविषयी गैरसमज पसरवण्यात आले.

गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात ! – सत्पाल महाराज, पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री

गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात आणि हे विज्ञानानेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातील देव डोलियांच्या गंगास्नानाने अमृताच्या थेंबांनी पूर्ण मानवजातीचे कल्याण होणार आहे, असे प्रतिपादन पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री सत्पाल महाराज यांनी येथे केले.