हरिद्वार कुंभमेळ्याला येणार्‍यांना नोंदणी करणे अनिवार्य

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने कुंभमेळ्यामध्ये येणार्‍या प्रत्येकासाठी नोंदणीकरण अनिवार्य केले आहे

हरिद्वार येथे साधू-संतांसह भाविकांनी केले माघी पौर्णिमेचे पवित्र स्नान !

माघ पौर्णिमेच्या निमित्ताने ‘हर की पौडी’ येथील ब्रह्मा कुंड आणि गंगेचा तट यांठिकाणी पहाटेपासून भाविकांनी पर्व स्नान केले. हरिद्वार कुंभमेळ्यासाठी येथे पोचलेले संत आणि महंत यांनीही या स्नानाचा आनंद घेतला.

कोरोनाच्या नावाखाली स्वतःच्या त्रुटी लपवण्याचा उत्तराखंड सरकारचा प्रयत्न ! – महंत नरेंद्र गिरि, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे संत, महंत अप्रसन्न होत असतील, तर याचा विचार सरकारने केला पाहिजे !

कुंभमेळ्याला येणार्‍या सर्व संतांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावा लागणार !

१ एप्रिलपासून प्रारंभ होणार्‍या कुंभमेळ्यासाठी येणार्‍या संतांनाही ३ दिवस आधी कोरोना चाचणीचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल सादर करावा लागणार आहे.

धार्मिक चित्रांच्या समोरच शौचालय उभारल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालय प्रमुखांनी अधिकार्‍यांना फटकारले !

कुंभमेळ्याच्या नियोजनात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात भावभक्ती नसल्यानेच ते अशा प्रकारची कृती करत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्वच ठिकाणी साधना करणारे कर्मचारी आणि अधिकारी असतील !

हरिद्वार कुंभमेळ्याची मानक संचालन प्रक्रिया रहित करण्यासाठी धरणे आंदोलन

कुंभच्या मानक संचालन प्रक्रियेच्या (एस्.ओ.पी.च्या) विरोधात व्यापार्‍यांनी सुभाषघाटावर अनिश्‍चितकालीन धरणे प्रारंभ केले आहे. व्यापार्‍यांनी कोरोना चाचणीचा अहवाल आणि नोंदणी अनिवार्य केल्याने त्यांनी कुंभनगरीमध्ये जाण्यास नकार दिला आहे.

महाशिवरात्रीच्या राजयोगी स्नानासाठी १० लाख भाविक येण्याची शक्यता

हरिद्वारमध्ये एका दिवसासाठी ८० लाख ते १ कोटी लोक येऊ शकतात.

हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाकडून संतांना शिबिरांसाठी भूमी देण्यास नकार !

विविध आखाड्यांकडून संतांसाठी सरकार आणि मेळा प्रशासन यांच्याकडे गंगानदी किनारी शिबिर उभारण्यासाठी भूमी देण्याची मागणी केली जात आहे. काही संतांनी भूमी न मिळाल्यास कुंभमेळ्यावर बहिष्कार घालण्याची चेतावणी दिली आहे.

हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये राज्य सरकारने महाशिवरात्रीला राजयोगी स्नानाऐवजी साधारण स्नान ठेवल्याने संन्यासी आखाडे संतप्त !

हिंदूंच्या धार्मिक कृतींमध्ये कुठल्याही पक्षाच्या सरकारने हस्तक्षेप न करता साधू, संत, महंत आणि शंकराचार्य यांना त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे.