‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’च्‍या अध्‍यक्षपदी शीतल धनवडे, तर उपाध्‍यक्षपदी प्रशांत आयरेकर !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील वार्ताहरांची शिखर संस्‍था असलेल्‍या ‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’ची निवडणूक ५ फेब्रुवारीला अत्‍यंत चुरशीने; मात्र खेळीमेळीच्‍या वातावरणात पार पडली.

पंचतत्त्वांचे संवर्धन करणारा, मानवी आरोग्‍य जपणारा आणि विविध माध्‍यमांतून प्रबोधन करणारा कणेरी मठ !

‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्‍थान’च्‍या वतीने २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे. या निमित्ताने सिद्धगिरी संस्‍थान, तेथील इतिहास-परंपरा, कार्य यांचा हा आढावा !

कळंबा (जिल्‍हा कोल्‍हापूर) कारागृहात बंदीवानाने केलेल्‍या आक्रमणात दुसर्‍या बंदीवानाचा मृत्‍यू !

गणेश गायकवाड याने सतपालसिंह याच्‍या डोक्‍यात मध्‍यरात्री दगड घातल्‍याने तो गंभीर घायाळ झाला होता. त्‍याला शासकीय रुग्‍णालयात उपचारांसाठी भरती करण्‍यात आले होते; मात्र त्‍याचा उपचाराच्‍या कालावधीत मृत्‍यू झाला.

कोल्‍हापूर येथून सुटणार्‍या दोन पॅसेंजर रेल्‍वेगाड्या २ मार्चपर्यंत रहित

या गाड्या रहित झाल्‍याने आता प्रवाशांना महालक्ष्मी एक्‍सप्रेस, महाराष्‍ट्र एक्‍सप्रेस, तसेच कोल्‍हापूर-कलबुर्गी एक्‍सप्रेस याच गाड्या उपलब्‍ध आहेत. याचसमवेत कोल्‍हापूर-हरिप्रिया ही रेल्‍वेगाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील ८ दिवस बेळगाव येथून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांचे पुष्‍कळ हाल होणार आहेत.

‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सवा’च्‍या प्रचाराच्‍या गाडीचे उद़्‍घाटन !

‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सवा’च्‍या प्रचाराच्‍या गाडीचे उद़्‍घाटन प.पू. अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्‍वामीजी, शिवसेना खासदार (शिंदे गट) धैर्यशील माने, तसेच माजी आमदार मदनदादा भोसले यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत पार पडले.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्‍यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांच्‍या खर्चास मान्‍यता !

अतिक्रमण काढण्‍याचा सर्व व्‍यय प्रारंभी शासन करणार आहे. नंतर हा व्‍यय संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे.

महाशिवरात्रीपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्‍त न झाल्‍यास शिवभक्‍त हा गड अतिक्रमणातून मुक्‍त करतील ! – विशाळगड संवर्धन समिती

विशाळगडाच्‍या मुंडाद्वारा शेजारील रणमंडळ या टेकडीवर शिवछत्रपतींचे एक भव्‍य स्‍मारक उभे करावे, अशी आमची मागणी आहे.

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून पंचतत्त्वांचे संवर्धन आणि लोकजागृती ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

सद्यःस्थितीत पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याने ‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ आयोजित केला आहे. त्याची ही पूर्वासिद्धता . . .

सोलापूर, कोल्हापूर विद्यापिठाच्या २ फेब्रुवारीपासून होणार्‍या सर्व परीक्षा स्थगित

वर्ष २०१६ पासून शिक्षकेतर कर्मचारी स्वत:च्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत; मात्र शासनाकडून केवळ आश्वासनाविना काहीही मिळत नाही. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांची हानी होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत होतो.

हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांवर ‘ईडी’ची धाड !

‘गोडसाखर’ साखर कारखान्यामध्ये अवैध १०० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच ११ जानेवारीला हसन मुश्रीफ यांचे कागल, पुणे येथील निवासस्थान यांच्यावरही धाड टाकण्यात आली होती.