‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’च्‍या अध्‍यक्षपदी शीतल धनवडे, तर उपाध्‍यक्षपदी प्रशांत आयरेकर !

प्रेसक्‍लबचे नूतन अध्‍यक्ष शीतल धनवडे (डावीकडून तिसरे), दिलीप भिसे, बाबा खाडे आणि प्रशांत आयरेकर

कोल्‍हापूर – कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील वार्ताहरांची शिखर संस्‍था असलेल्‍या ‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’ची निवडणूक ५ फेब्रुवारीला अत्‍यंत चुरशीने; मात्र खेळीमेळीच्‍या वातावरणात पार पडली. यात अध्‍यक्षपदासाठी दैनिक ‘सामना’चे शीतल धनवडे, उपाध्‍यक्षपदी ‘बी’ न्‍यूजचे प्रशांत आयरेकर यांची निवड झाली. याचसमवेत कार्याध्‍यक्षपदी दैनिक ‘पुढारी’चे दिलीप भिसे, तर सचिवपदी बाबा खाडे यांची निवड झाली आहे.