बुद्धीभेद, निखालस खोटे आरोप अन् हिंदूंमध्‍ये दुफळी निर्माण करण्‍याचे कारस्‍थान !

दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्‍टेंबरला प्रसिद्ध केलेल्‍या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !

हिंदुद्वेषी ‘एडिटर्स गिल्‍ड’ !

‘एडिटर्स गिल्‍ड ऑफ इंडिया’चा हिंदुविरोधी तोंडवळा जगापुढे आला आहे. त्‍यामुळे सरकारने या प्रकरणी आता मागे न हटता सातत्‍याने दुतोंडी भूमिका घेणार्‍या ‘एडिटर्स गिल्‍ड’ची पाळेमुळे खणून ‘तिच्‍या मागे कोण आहे ?’, ‘त्‍याला कोण पैसा पुरवते ?’, याची सत्‍यता जनतेसमोर मांडून हिंदुविरोधी पत्रकारितेला चाप लावावा !

‘चंद्रयान-२’च्‍या अपयशावरून ‘बीबीसी’ने भारतावर केलेल्‍या टीकेचा जुना व्‍हिडिओ प्रसारित !

बीबीसीची भारतद्वेषी मानसिकता असल्याने तिच्याकडून याहून वेगळे काय घडणार ? अशा वृत्तवाहिनीवर भारतात बंदी घालणेच योग्य ठरील !

जगभर ‘सनातन धर्मा’चा जागर होत आहे ! – शहजाद पुनावाला, राष्ट्रीय प्रवक्ता, भाजप

शहजाद पुनावाला पुढे म्हणाले की, देवर्षी नारद यांच्या नावावरून काही लोक टीका करतात; परंतु त्यांना त्यांचे महत्त्व कळून येत नाही. देवर्षी नारदमुनी हे खरे आदर्शवादी पत्रकार होते.

सातारा येथे पत्रकारांनी केली पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची होळी !

पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही होत नसल्‍यामुळे हा कायदा कुचकामी ठरला आहे. त्‍यामुळे सातारा जिल्‍ह्यातील सहस्रो पत्रकारांनी एकत्र येत पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची होळी केली.

पत्रकारावर अन्‍याय का ?

नूंह (मेवात) येथील भीषण दंगलीनंतर तेथे वार्तांकनासाठी गेलेले ‘सुदर्शन न्‍यूज’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि निवासी संपादक मुकेश कुमार यांना पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. प्रारंभी ‘मुकेश कुमार यांचे काही गुंडांनी अपहरण केले आहे’, अशा बातम्‍या होत्‍या.

गुजरात दंगलीवरील वादग्रस्त माहितीपटासाठी बीबीसीवर कारवाई करण्याचे विधेयक गोवा विधानसभेत संमत

मुख्यमंत्र्यांनी ‘हा माहितीपट सार्वजनिक करू शकत नाही. त्यावर बंदी आहे’, याची जाणीव करून देतांना म्हटले की, ‘देशाच्या पंतप्रधानांना अवमानित केले जात आहे, त्याचे काही नाही. सर्व विरोधक मात्र बीबीसीला पाठिंबा द्यायला उभे रहात आहेत !’

प्रखर हिंदुत्वनिष्ठ डी.के. प्रकाश भारद्वाज यांचा सत्कार !

बेंगळुरू येथील महालक्ष्मी अम्मण्णी महिला महाविद्यालयात ‘प्रेस डे’, तसेच ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय शाकाहारी शरीर सौष्ठवपटू आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ डी.के. प्रकाश भारद्वाज यांचा सत्कार करण्यात आला.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या वतीने दैनिक ‘सनातन प्रभात’चे सुनील नांगरे यांना ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान !

‘‘पत्रकारांना पत्रकारांच्या समितीकडूनच सन्मान मिळणे, हे कौतुकास्पद असून पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून आपल्या जिल्ह्यातील पत्रकार हे नेहमी आपल्या लेखणीतून समाजाला योग्य दिशा आणि पीडित घटकाला योग्य न्याय देण्याचेही काम नेहमी करत असतात.’’

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्कार प्रदान !

राष्ट्र आणि भारतीय संस्कृती यांकडे वक्रदृष्टीने पहाणार्‍यांच्या विरोधात सातत्याने संवैधानिक मार्गाने संघर्ष करणे, हिंदुद्वेषी चित्रकार एम् एफ्  हुसेन आणि डॉ. झाकीर नाईक यांचे राष्ट्र तथा समाज विरोधी स्वरूप लोकांसमोर आणणे, तसेच भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ पुस्तकांचे लेखन करणे, यांसाठी श्री. रमेश शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.