सांगली येथे व्यावसायिकाच्या बंगल्यावर ‘ईडी’ची धाड !

आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. या अन्वेषणाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यास ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी नकार दिला आहे.

ओडिशा रेल्वे अपघाताच्या प्रकरणी रेल्वेचा कनिष्ठ अभियंता आमीर खान पसार

अपघातानंतर सीबीआयने आमीर खान याची चौकशी केली होती. तेव्हापासून तो कुटुंबासह बेपत्ता आहे. या अपघातामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम’मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.

गोवा : केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात चोरी

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! केपे तालुक्यातील गुडी-पारोडा येथील पर्वतावरील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात अज्ञात चोरट्यांनी घुसून दानपेटी बाहेर आणून फोडून रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली. काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोव्यात ३० टक्के शॅक देहलीवाल्यांना अनधिकृतपणे चालवण्यास दिले जातात ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पर्यटन खात्यातील अधिकारी किंवा एखादी व्यक्ती शॅकधारकांकडून पैसे मागत असल्यास तक्रार का प्रविष्ट केली जात नाही ? एकीकडे पर्यटन खात्यावर आरोप करायचे आणि दुसरीकडे अवैध कृती चालूच ठेवायची, हे चालणार नाही.

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी समितीने अहवालासाठी आणखी २ मास मागितले

जानेवारी २०२३ मध्ये समितीची स्थापना झाली आणि समितीला ३० दिवसांच्या आत सरकारला अहवाल सुपुर्द करायचा होता; मात्र समितीने आतापर्यंत केवळ प्राथमिक अहवालच सरकारला सुपुर्द केला आहे. समितीने आणखी अवधी मागितला आहे.

गोवा : वनक्षेत्रांना लागलेली आग नैसर्गिक कि मानवनिर्मित ?

ज्यात मागील २ मासांत वनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. वन खात्याने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार मार्च मासाच्या पहिल्या पंधरवड्यात खासगी वनक्षेत्रांत ७४ ठिकाणी, तर ३ वन्यजीव अभयारण्यांमध्ये ३२ ठिकाणी आगी लागल्या.

छत्रपती संभाजीनगर येथे उत्तरपत्रिकांत हस्ताक्षरांत पालट !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी इयत्तेच्या परीक्षांचे निकाल तोंडावर असतांना उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षर पालट आणि कथित अपप्रकारांवर मंडळाच्या येथील कार्यालयात सुनावणी चालू झाली आहे.

गोवा : वनांना लागलेल्या आगींच्या संदर्भात वनखात्याकडून अज्ञातांविरुद्ध ३४ प्रथमदर्शनी गुन्ह्यांची नोंद

भारतीय वन कायदा १९२७, वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२ आणि गोवा दमण आणि दीव वनसंरक्षण कायदा १९८४ या कायद्यांच्या अंतर्गत हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

गोवा : सांगे येथील पुरातन स्थळी अवैध चिरेखाणीवर कारवाई न केल्याच्या प्रकरणी गोवा खंडपिठाचे सरकारवर ताशेरे

गोवा खंडपिठाने अनधिकृत चिरेखाण व्यवसायावर आळा घाळण्यासाठी गोवा सरकारने लेखी स्वरूपात ‘प्रोटोकॉल’ सिद्ध करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑगस्ट २०२३ या दिवशी होणार आहे.

गोवा : काणकोण मामलेदार कार्यालयातील आगीत अनेक जुनी कागदपत्रे जळून खाक

राज्यात हल्लीच अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. भूमी बळकावल्याची प्रकरणे आणि आग दुर्घटना यांचा काही संबंध आहे का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.