सीबीआयने आमीर खान याच्या घराला ठोकले टाळे !
बालासोर (ओडिशा) – येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २९२ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) केले जात आहे. सीबीआयने ‘सोरो सेक्शन सिग्नल’चे कनिष्ठ अभियंता आमीर खान याच्या घराला टाळे ठोकले आहे. येथे तो त्याच्या कुटुंबासह भाड्याने रहात होते.
कहां गया बालासोर ट्रेन हादसे का सिग्नल इंजीनियर आमिर? CBI ने बताया फरार, तो रेलवे ने बता दी सच्चाईhttps://t.co/jVnuV4rMxb
— Newsroompost (@NewsroomPostCom) June 20, 2023
अपघातानंतर सीबीआयने आमीर खान याची चौकशी केली होती. तेव्हापासून तो कुटुंबासह बेपत्ता आहे. या अपघातामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम’मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. अपघाताच्या प्रकरणी बहनागा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्टरसह ५ रेल्वे कर्मचार्यांची चौकशी करण्यात येत आहे.