छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील तिसगाव आश्रमशाळेतील तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. शाळेत सकाळचे दूध प्यायल्याने ही विषबाधा झाली आहे. खुलताबाद येथील ही शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.