ख्रिस्ती धर्म प्राचीन असल्याचा खोटा प्रचार करून ख्रित्यांकडून  भारतात धर्मातर ! – एस्थर धनराज, सल्लागार, भारतीय स्वाभिमान समिती, तेलंगाणा

‘जोपर्यंत भारतातील भूभाग ख्रिस्त्यांसाठी देत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून हिंदूंचे धर्मातर चालू राहील’, अशा प्रकारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचा प्रचार चालू आहे. असे असूनही ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कोणतीही कारवाई होत नाही.

पुरी (ओडिशा) येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !

भगवान जगन्नाथ रथयात्रा मंदिरापासून अनुमाने ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरापर्यंत जाते, जे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर असल्याचे मानले जाते. या रथयात्रेत अनुमाने २५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.

नाशिक येथील श्री विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त रवींद्र पाटील यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार !

श्री. रवींद्र पाटील म्हणाले, ‘‘येथे हिंदुत्वाच्या अधिवेशनाऐवजी संत आणि महापुरुष यांच्यामध्ये असल्याप्रमाणे मला वाटत आहे. येथे सेवा करणार्‍या सर्वांच्या मुखावर किती तेज आहे ! सर्वांच्या वागण्यात किती नम्रता आहे.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या उपासनेने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक संत, सनातन संस्था

आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण आपल्या कृतीच्या फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून आनंद मिळवतो.

राजा हिंदुत्वनिष्ठ असणे, ही काळाची आवश्यकता ! – अभिनेते शरद पोंक्षे

ज्या दिवशी भारतात हिंदू ४९ टक्के होतील, त्या दिवशी निधर्मीवाद संपलेला असेल. बजरंग दलावर बंदी आणण्याचे आश्‍वासन देऊन काँग्रेस सरकार कर्नाटकात सत्तेवर येते.

धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा सनातन धर्म असलेला आत्मा पालटणार नाही ! – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्‍या श्रीकृष्णाचे चित्र होते.

बौद्धिक युद्ध लढण्यासाठी आचार्य चाणक्य यांची बुद्धीमत्ता आणि छत्रपती शिवाज महाराज यांचे शौर्य अंगी असणे आवश्यक ! – संतोष केंचम्बा, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्र धर्म संघटन

देशात खोटी कथानके (नॅरेटिव्ह्स) रचून ती सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या माध्यमातून वैचारिक आक्रमण चालू आहे. हा ‘सायबर जिहाद’ आहे.

हिंदु धर्म स्वीकारणारे चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी दिले भाजपचे त्यागपत्र !

केरळचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि भाजपच्या केरळ प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अली अकबर उपाख्य रामासिम्हन् अबुबकार यांनी १६ जून या दिवशी पक्षाचे त्यागपत्र दिले. गेल्या काही आठवड्यांपासून भाजपला सोडचिठ्ठी देणारे चित्रपटदृष्टीतील ते तिसरी व्यक्ती आहेत.

आक्रमकांनी नष्ट केलेल्या देशातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करावा !

संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरे जपली पाहिजेत. यासाठी गोवा येथे गोमंतक मंदिर महासंघ काम करत आहे, तर महाराष्ट्रात महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

लालमहालात (पुणे) सलग १२ घंटे वारकर्‍यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद !

पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.