वर्धा – ज्या दिवशी भारतात हिंदू ४९ टक्के होतील, त्या दिवशी निधर्मीवाद संपलेला असेल. बजरंग दलावर बंदी आणण्याचे आश्वासन देऊन काँग्रेस सरकार कर्नाटकात सत्तेवर येते. एक महिना होत नाही, तोच डॉ. हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा शिक्षणातून काढून टाकला जातो. असे व्हायला नको असेल, तर राजा हिंदुत्वनिष्ठ असणे, ही पुढील काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अभिनेते आणि वक्ते शरद पोंक्षे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या सुवर्ण महोत्सवीदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वर्धा शाखेच्या वतीने हिंदु साम्राज्य दिनाचे आयोजन येथे करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,
१. हिंदु कुणावर आक्रमण करत नाहीत; पण येथे हिंदू बहुसंख्य असल्याने निधर्मीवाद उफाळला आहे.
२. महाराष्ट्रासह भारतात ‘हिंदु’ शब्दावरून गदारोळ चालू आहे. दुसरीकडे औरंगजेब, टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली जात आहे. आम्ही हिंदु म्हणून जन्माला आलो, हे पाप केले का ?
३. ब्रिटिशांनी हिंदूंना हिंदुस्थानापासून दूर नेले. आपण इंग्रजी भाषेसमोर नतमस्तक होतो; कारण ९० टक्के हिंदू अज्ञानी आहेत.