नाशिक येथील श्री विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त रवींद्र पाटील यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार !

विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील

नाशिक येथील विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या आयोजनात सहभागी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार काढले. महोत्सवाच्या व्यासपिठावरून मनोगत व्यक्त करतांना श्री. रवींद्र पाटील म्हणाले, ‘‘येथे हिंदुत्वाच्या अधिवेशनाऐवजी संत आणि महापुरुष यांच्यामध्ये असल्याप्रमाणे मला वाटत आहे. येथे सेवा करणार्‍या सर्वांच्या मुखावर किती तेज आहे ! सर्वांच्या वागण्यात किती नम्रता आहे. सर्वांचा तोंडवळा सात्त्विक असून कुणाच्या चेहर्‍यावर अहंकार नाही. येथील वातावरण अतिशय चांगले आहे. येथे उपस्थित असलेल्या सनातनच्या साधिकांशी बोलतांना श्री भगवतीदेवीच आपल्याशी बोलण्यासाठी आल्यासारखे वाटते.’’