विद्याधिराज सभागृह, १८ जून (वार्ता.) – राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्या श्रीकृष्णाचे चित्र होते. त्या राज्यघटनेला त्या वेळेच्या संसदेने सर्वसंमतीने स्वीकारले होते. याचा अर्थ भारताचा आत्मा असलेल्या सनातन धर्मालाच मान्यता मिळाली होती. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा आत्मा पालटणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (डॉ.) एस्.सी. उपाध्याय यांनी केले.
भारत ‘हिंदु राष्ट्र’ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ध्येयवाक्य ‘यथो धर्म: ततो जय: ।’ असे लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणते, ‘जेथे धर्म आहे, तेथे सत्य आहे आणि जेथे सत्य आहे, तेथे विजय आहे.’
हिंदु जनजागृती फार चांगले कार्य करत आहे. अशाच प्रकारे हिंदूंना संघटित केले पाहिजे. भारताच्या गल्लीबोळांमध्ये जागृत हिंदू आहेत, त्यांना संघटित केले पाहिजे. धर्मांध शेकडोच्या संख्येने हिंदूंवर आक्रमण करत असतील, तर हिंदूंचेही सहस्रो स्वयंसेवक सिद्ध असायला हवेत.