ख्रिस्ती धर्म प्राचीन असल्याचा खोटा प्रचार करून ख्रित्यांकडून  भारतात धर्मातर ! – एस्थर धनराज, सल्लागार, भारतीय स्वाभिमान समिती, तेलंगाणा

भारतीय स्वाभिमान समितीच्या सल्लागार एस्थर धनराज

रामनाथ (फोंडा), २१ जून (वार्ता.) – येशू ख्रिस्ताच्या काळात त्याचा शिष्य भारतात येऊन त्याने भारतामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला, असा खोटा प्रचार ख्रिस्तांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात १६ व्या शतकापर्यंत भारतात ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. ख्रिस्ती धर्मामध्ये सर्वाधिक अंधश्रद्धा आहे. विदेशात मोठ्या विद्यापिठांची स्थापना झाल्यानंतर पहिली १०० वर्षे तेथे ख्रिस्ती धर्माचे शिक्षण दिले गेले. त्यानंतर विद्यापिठांमध्ये अर्थशास्त्र, गणित आदी विविध विषय शिकवण्यात येत आहेत. याउलट भारताच्या विद्यापिठांमध्ये धर्माचे शिक्षण दिले जात नाही. ख्रिस्ती धर्मप्रचारक राष्ट्रविरोधी प्रचार करत आहेत.

‘जोपर्यंत भारतातील भूभाग ख्रिस्त्यांसाठी देत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून हिंदूंचे धर्मांतर चालू राहील’, अशा प्रकारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचा प्रचार चालू आहे. असे असूनही ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कोणतीही कारवाई होत नाही. ख्रिस्ती धर्मप्रचारकांना प्रचार करण्यापूर्वी हिंदु धर्माविषयी शिक्षण देऊन शत्रूभेद शिकवला जातो. सर्व हिंदूंनी ख्रिस्त्यांच्या प्रचाराचे तंत्र समजून घ्यायला हवे. हिंदूंनी याचा अभ्यास करून घेणे आवश्यक आहे. हिंदूंनी याचा अभ्यास केला, तरच ते ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा प्रतिवाद करू शकतील, असे वक्तव्य तेलंगाणातील भारतीय स्वाभिमान समितीच्या सल्लागार एस्थर धनराज यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीच्या सत्रात केले.