श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापना-विधीच्या वेळी मिळालेल्या दैवी प्रचीतींच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्याला बळ पुरवण्यासाठी श्री भवानीदेवी सनातनच्या आश्रमात विराजमान झाली. प्रतिष्ठापना-विधीच्या वेळी मिळालेल्या दैवी प्रचीतींच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

नवरात्रीनिमित्त विशेष सदर…

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

भारताची फाळणी धर्माच्या नावावर झाल्यावर मुसलमानांना पाकिस्तान हे ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून मिळाले. काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणामुळे भारत हा हिंदूंना न मिळता ‘सेक्युलर’ (निधर्मी) देश झाला. याचे अनेक दूरगामी परिणाम झाले….

शक्तिदेवता !

देवी चंद्रघण्टा हे पार्वतीचे विवाहित रूप आहे. देवी पार्वतीचा शिवाशी विवाह झाल्यावर तिने तिच्या मस्तकावर घंटा रूपात अलंकार म्हणून चंद्र धारण केला आहे. देवीचे चंद्रघण्टा हे रूप सदैव शस्त्रसज्ज असते. ती दशभुजा असून तिची कांती सुवर्णमय आहे. चंद्रघण्टा देवीकडे असलेल्या घंटेतून बाहेर पडणार्‍या चंड-ध्वनीला दानव सदैव घाबरतात.

‘इंद्राक्षी’ स्तोत्राची महती आणि सध्याच्या आपत्काळात त्याचे महत्त्व !

ज्वरशमन करण्याची आणि रोगनिवारण करण्याची शक्ति आदिशक्तीमध्ये आहे. मनुष्याने भक्तीभावाने आदिशक्तीच्या ‘इंद्राक्षी’ रूपाची स्तुती केल्यास सर्व ज्वर आणि रोग दूर होतील. श्रीविष्णूने नारदाला ‘इंद्राक्षीस्तुति’ सांगितली. नारदांनी ती सूर्याला आणि सूर्याने ती इंद्राला सांगितली. इंद्राने ही स्तुती सचीपुरंदर ऋषींना सांगितली. अशा प्रकारे सचीपुरंदर ऋषींकडून हे स्तोत्र मनुष्यजातीला मिळाले.

ऋषीवाणी, देववाणी आणि गुरुवाणी कधीही असत्य होत नसल्यामुळे नाडीपट्टीत महर्षींनी सांगितल्यानुसार ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे धर्मसंस्थापना करतील’, हे निःसंशय !

ऋषीवाणी, देववाणी आणि गुरुवाणी कधीही असत्य होऊ शकत नाही. आदिशक्तीच्या साहाय्याने श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले पृथ्वीवर धर्मसंस्थापना करतील, यात यत्किंचितही संशय नसावा !

हिंदु जनजागृती समितीचे २० वे वर्ष : हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

येत्या ३ वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होणार !

वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे, हे आता शंकराचार्यही म्हणू लागले आहेत. आता केंद्र सरकारने या दिशेने प्रयत्न करून राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ (सेक्युलर) हा शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ असा पालट करून या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याची घोषणा करणारे महंत परमहंस दास यांची माघार

वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच असल्याने अशा उपोषणाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अशा संत-महंतांनी देशभरात जागृती करून हिंदूंना संघटित केले पाहिजे !