सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी १८ फेब्रुवारी या दिवशी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे आणि सौ. स्नेहा भोवर यांनी सांगितला.

Code of Ethics for OTT : ओ.टी.टी.वरील अनैतिकतेचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करा ! – उदय माहूरकर, संस्थापक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’

भारताने आपल्या सांस्कृतिक सार्वभौमत्वावर ठाम रहाण्याची आणि आपली परंपरागत मूल्ये जपण्याची वेळ आली आहे.

धर्माला धारण करणारा राम म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच राम ! – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती, अकोला

आद्यशंकराचार्य यांनी धर्माची व्याख्या करतांना म्हटले आहे की, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, तसेच समाजव्यवस्था उत्तम राखणे या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ म्हणतात.

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप

माझ्या सभा न होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत; पण मी थांबणार नाही. मी हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मसभा घेणारच ! ज्या ज्या गडांवर अतिक्रमण झाले आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पाडण्याचे आदेश द्यावे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांचे निधन !

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर, तसेच एकनिष्ठ शिवसैनिक मनोहर जोशी (वय ८६ वर्षे) यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने २३ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजता निधन झाले.

आदर्श शिवजयंती साजरी करणारे बोईसर येथील मुरबे गाव !

राष्ट्र आणि धर्मरक्षणाचा आदर्श देणार्‍या मुरबे ग्रामस्थांचे अभिनंदन !

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत, चैतन्याचे स्त्रोत आहेत. ते टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मंदिरांचे पावित्र्य राखणे, संघटन करणे, सुव्यवस्थापन करणे हे सर्व कार्य ईश्‍वराचे अधिष्ठान ठेवून करणे आवश्यक आहे.

आज माणगांव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’

मंदिरांच्या प्राचीन प्रथा-परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन, मंदिरांचे व्यवस्थापन, पुरातन मंदिरांचे जतन, मंदिरांतील समस्या सोडवणे यांसाठी २० फेब्रुवारी या दिवशी कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’ होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने चोपडा (जळगाव) येथे आज होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी या दिवशी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.

कर्नाटक राज्यातील शाळांमधील स्वागताच्या फलकावरील ‘हे ज्ञानमंदिर आहे, हात जोडून आत या’ हे वाक्य हटवले !

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे, त्याचेच हे उदाहरण होय !
काँग्रेसला मत देऊन सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंनी सरकारच्या अशा कृत्यांचा संघटित होऊन विरोध केला पाहिजे !