हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !

रायगड, ११ एप्रिल ( वार्ता.) – रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले, तसेच शेकडो धर्मप्रेमींनी रामराज्याची प्रतिज्ञा घेतली.

भेरसे येथे गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची इच्छा धर्मप्रेमींनी व्यक्त केली. वर्‍हाड येथे धर्मप्रेमींनी ग्रामदेवता श्री व्याघ्रेश्वर मंदिराची स्वच्छता करून राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आशीर्वाद घेतले.

गुढीपाडवा सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्था कळंबोली यांच्या वतीने कळंबोली येथे काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेत, तसेच खांदा वसाहत, रामनाथ (अलिबाग), कोलाड, पेण येथील शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्था आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक सहभागी झाले होते.