बगडीनगर (जिल्हा पाली, राजस्थान) – सण-उत्सव साजरे करण्यामागील शास्त्र ठाऊक नसल्याने बहुतेकांना त्यांचा लाभ पूर्णपणे घेता येत नाही, तसेच ते साजरे करतांना काही विकृत प्रथा वाढत चालल्या आहेत. त्यामुळे धर्मशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या सणांचे शास्त्र समाजापर्यंत पोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. येथील ‘कलालो के बास’मधील शिवमंदिरामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक स्थानिक धर्मप्रेमी त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते.
या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री तरुण मेवाडा, घनश्याम मेवाडा, जगदीश मेवाडा आणि दीपक वैष्णव आदी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी झाले होते. या वेळी हनुमान चालीसाच्या पठणाचा लाभ घेण्यासाठी विविध टप्प्यांवर कोणते प्रयत्न करावेत ? मंदिर दर्शनाची योग्य पद्धत कोणती ? याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यासमवेतच ‘रामभक्त हनुमानाची दैवी वैशिष्ट्ये सांगून ते स्वत:त आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत ?’, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.