सूर्यदेवाचे माहात्म्य !
माघ शुक्ल सप्तमी हा दिवस सर्व भारतात ‘रथसप्तमी’ म्हणून मानला गेला असून या दिवशी सर्वत्र भक्तीभावाने सूर्यपूजन होत असते. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी भगवान सूर्यनारायण ७ घोडे जुंपलेल्या नवीन रथातून मार्ग आक्रमण करत असतो.