अंबेजोगाई येथे होणार देशी गोवंशियांचे संवर्धन !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. या गोशाळेसाठी १३ नियमित पदे आणि ३७ पदे कंत्राटीपद्धतीने भरण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे.

बावळाट येथे १८ गोवंशियांची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली !

गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या गोतस्करांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या गोतस्करांवर वचक बसणार नाही !

उंब्रज (तालुका कराड) येथील गोरक्षक वैभव जाधव यांचा सत्कार !

‘गोशाला महासंघ महाराष्ट्र गोरक्षा स्थली स्मारक समिती, पुसद’ (जिल्हा यवतमाळ) यांच्या वतीने गोरक्षण क्षेत्रात काम करणार्‍या महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळा यांचा सत्कार करण्यात आला.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पातून वगळली मागील भाजप सरकारची गोशाळा योजना !

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! हिंदु आणि भाजप यांच्या द्वेषापोटीच काँग्रेस सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. याचा हिंदु संघटनांनी आणि धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !

गोवा : झुवारीनगर येथे ‘जनकल्याण सेवा समिती’ यांचा सांकवाळ पंचायतीच्या विरोधात ‘झोळी’ कार्यक्रम

राजभवनमध्ये गोशाळा उभारणारे सरकार यात लक्ष घालून ही समस्या सोडवेल का ?

प्रत्येक हिंदु कुटुंबाने २ गायी पाळल्या, तर भारतात गोशाळांची आवश्यकता भासणार नाही ! – अधिवक्ता आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आमच्यासाठी गुरु द्रोणाचार्याप्रमाणे आहेत. परमपूज्य डॉ. आठवलेगुरुजी यांना पाहिल्यावर पुष्कळ ऊर्जा मिळते. तशीच ऊर्जा या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सहभागी झाल्यावर मिळत असते आणि ती आम्हाला वर्षभर पुरते.

पुणे येथील व्यावसायिक अभय संचेती यांच्याकडून ३५ गायींचे संगोपन !

समाजातील प्रत्येक व्यक्तीने गायीची सेवा केली पाहिजे, या उदात्त हेतूने ‘ओम् गुरु आनंद गोशाळे’च्या माध्यमातून ३५ गायींचे संगोपन करण्यात येत आहे. मार्केट यार्ड येथे रहाणारे व्यावसायिक अभय संचेती आणि त्यांचे कुटुंबीय हे सेवाकार्य गेल्या १० वर्षांपासून करत आहेत.

महाराष्ट्रातील ३२४ गोशाळांना देण्यात येणार ६५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य !

गोशाळांना साहाय्य करण्यासह गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही होत आहे ना, याकडेही शासनाने लक्ष द्यावे !

भूमाफियांच्‍या आर्थिक लाभासाठीच ‘गोरक्षण संस्‍थे’च्‍या भूमीवरून समितीला हटवण्‍याचे कार्य चालू ! – सुनील पावसकर, गोरक्षण बचाव समिती, अध्‍यक्ष

येथील मध्‍यवर्ती भागात असलेल्‍या ‘गोरक्षण संस्‍थे’च्‍या जागेवर विकास आराखड्याच्‍या नावाखाली आरक्षण टाकून व्‍यापारी संकुलनाचा घाट घातला जात आहे. कराड नगर परिषद तांत्रिक कारणे देऊन आरक्षणाची सद्यस्‍थितीची माहिती देण्‍यास टाळाटाळ करत आलेली आहे.

कराड येथील गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी कार्यरत असणार्‍या नगरपरिषदेच्या विरोधात ‘गोरक्षण बचाव समिती’चे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण !

गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी गोप्रेमींच्या महाराष्ट्रात करण्यात येणारी दडपशाही संतापजनक !