
बेंगळुरू (कर्नाटक) – वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ७ जुलै या दिवशी विधानसभेत सादर केला. यात मागील भाजप सरकारने घोषित केलेल्या अनेक लोकप्रिय योजनांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. भाजप सरकारकडून गोमातांच्या रक्षणासाठी जिल्ह्यात एक गोशाळा उभारण्याचे ठरवण्यात आले होते, तसेच ‘विवेक सिरी (समृद्धी)’ या अंतर्गत सरकारी शाळांच्या अभिवृद्धीसाठी शाळेतील वर्ग वाढवण्याची योजना होती; मात्र या दोन्ही योजनांना काँग्रेस सरकारने तिलांजली दिली आहे.
‘विवेक सिरी’ योजनेच्या अंतर्गत राज्यातील सरकारी शाळांमधील ८०० वर्ग वाढवण्यात येणार होते. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या नावाने प्रस्तावित या योजनेच्या अंतर्गत राज्यातील २४ सहस्र शाळांना भगवा रंग देण्यात येणार होता. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसने यास विरोध केला होता. आता सत्तेत आल्यावर काँग्रेसने त्याला केराची टोपलीच दाखवली आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसचा हिंदुद्वेष ! हिंदु आणि भाजप यांच्या द्वेषापोटीच काँग्रेस सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. याचा हिंदु संघटनांनी आणि धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे ! |
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड