गोशाळेच्या माध्यमातून गायींचे सेवा करणार्या अभय संचेती कुटुंबियांचे अभिनंदन ! या स्तुत्य उपक्रमाचा गोप्रेमींनी घ्यावा!
पुणे – समाजातील प्रत्येक व्यक्तीने गायीची सेवा केली पाहिजे, या उदात्त हेतूने ‘ओम् गुरु आनंद गोशाळे’च्या माध्यमातून ३५ गायींचे संगोपन करण्यात येत आहे. मार्केट यार्ड येथे रहाणारे व्यावसायिक अभय संचेती आणि त्यांचे कुटुंबीय हे सेवाकार्य गेल्या १० वर्षांपासून करत आहेत. वर्ष २०१३ मध्ये मावडी (सासवड) परिसरामध्ये त्यांनी स्व खर्चाने गोठ्याची उभारणी केली आहे. नव्या पिढीला आणि समाजातील इतर लोकांना गायीचे महत्त्व कळावे, या उद्देशाने त्यांचे हे सेवाकार्य चालू आहे. या गोशाळेत गायींना पेंड, भुसा असा पोषक आहार दिला जातो. सध्या उसाचे वाढे, घास, ज्वारीचा कडबा आदी चाराही दिला जातो. या गोशाळेसाठी संचेती यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, नातेवाईक आणि समाजातील दानशूर व्यक्तींचे साहाय्य लाभत आहे.