शास्‍त्रीय पद्धतीने आदर्श गणेशोत्‍सव करणारी मिरज येथील विद्या मंदिर प्रशाला ! 

विद्या मंदिर प्रशालेत बसवण्‍यात आलेल्‍या श्री गणेशमूर्तीसह उपस्‍थित शिक्षक आणि इतर 

मिरज, २१ सप्‍टेंबर (वार्ता.) – मिरज येथील विद्या मंदिर प्रशालेत गेली काही वर्षे शास्‍त्रीय पद्धतीने आणि पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा केला जातो. शाळेतील शिक्षिका सौ. श्‍वेता सुनील वसगडे आणि विद्यार्थी यांनी शाडू मातीची श्री गणेशमूर्ती सिद्ध केली आहे, तसेच बाजूची सजावट नैसर्गिकरित्‍या सिद्ध करण्‍यात आली आहे. प्रशालेत मूर्ती प्रतिष्‍ठापना, नित्‍य पूजा, आरती आणि सत्‍यनारायणाची पूजा यांसह सर्व सेवा या शिक्षक अन् विद्यार्थी एकत्र मिळून पार पाडतात.

५ दिवसांचा हा उत्‍सव आदर्शरित्‍या करून प्रशालेने इतरांसमोर आदर्श उदाहरण ठेवले आहे. या उपक्रमासाठी मिरज विद्या समितीचे अध्‍यक्ष श्री. शैलेश देशपांडे, मुख्‍याध्‍यापक श्री. आर्.व्‍ही. कुलकर्णी, शिक्षिका सौ. श्‍वेता सुनील वसगडे अन्‍य सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांचा त्‍यात सहभाग आहे.