– वेणुगोपाल जिला, अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघ
सोलापूर, २० सप्टेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या कष्टाचा पैसा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. त्यामुळे हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करू नयेत, यासाठी शहरातील प्रत्येक हिंदु कुटुंबाची जनजागृती करण्याचा निर्धार येथील पुरोहितांनी संघटितपणे केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पूर्व विभाग, दत्त मंदिर या ठिकाणी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे, अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे श्री. वेणुगोपाल जिला, श्री हिंगुलांबिका मंदिराचे पुजारी श्री. संजय हंचाटे, पंतुलु (पुरोहित) श्री. निरंजन कुडक्याल, यांच्यासह अन्य पुरोहित उपस्थित होते.
या वेळी श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना ‘हलाल जिहाद’चे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये शहरातील विविध भागांतील पुरोहित सहभागी झाले होते. शहरातील ५०० हून अधिक पुरोहितांच्या माध्यमातून यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हलालमुक्त साजरा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपस्थित पुरोहितांनी सांगितले.