नाशिक येथे पालिका घेणार पीओपीच्‍या श्री गणेशमूर्ती विक्री न करण्‍याविषयीचे हमीपत्र !

‘पीओपीच्‍या श्री गणेशमूर्तींनी प्रदूषण होत नाही’, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्‍यामुळे गोदावरीचे प्रदूषण होऊ नये, यासाठी नदीमध्‍ये कारखान्‍यांद्वारे सोडले जाणारे घातक रसायनयुक्‍त पाणी थांबवणे आवश्‍यक आहे !

प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या श्री गणेशमूर्ती बनवण्‍यास कोणतीही बंदी नाही; मात्र प्रदूषण टाळण्‍यासाठी कृत्रिम तलावांची संख्‍या वाढवणार !

प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या श्री गणेशमूर्ती बनवण्‍यास शासनाने कोणतीही बंदी केलेली नाही; मात्र या मूर्तींमुळे कोणत्‍याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये; म्‍हणून कृत्रिम तलावांची संख्‍या वाढवण्‍यात येईल. राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना तशा सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

गोवा : यंदाही अनुदानात वाढ न झाल्यामुळे शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार अप्रसन्न !

स्थानिक हस्तकला जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात, मग श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी अनुदानात वाढ करण्यास कोणती अडचण ?

पुणेकरांनो, शाडू आणि चिकण मातीच्‍या श्री गणेशमूर्ती खरेदी करा ! – डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्‍त आयुक्‍त, पुणे

पुणेकर नागरिकांनो, शाडू माती, चिकण माती अशा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्‍या श्री गणेशमूर्ती खरेदीस प्राधान्‍य द्यावे.

श्री गणेश मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती निर्मितीस प्राधान्य द्यावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

या वर्षी १९ सप्टेंबर या दिवशीपासून गणेशोत्सव चालू होत आहे. मूर्तीकारांची मूर्ती बनवण्याची लगबग चालू झाली आहे. गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीची मूर्ती बनवली पाहिजे, अशी सूचना आहे.

यंदा गणेशचतुर्थीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना थारा नाही ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, गोवा हस्तकला महामंडळ

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. यामुळे या मूर्तींचे विडंबन होते आणि पर्यावरणाचीही हानी होते. यामुळे अशा गणेशमूर्तींची विक्री रोखण्यासाठी हस्तकला महामंडळ प्रयत्नशील रहाणार आहे.

यावर्षीही ‘पीओपी’च्या श्री गणेशमूर्तींना अनुमती हवीच ! – अधिवक्ता आशिष शेलार, भाजप अध्यक्ष तथा आमदार

कोट्यवधींची उलाढाल असलेला आणि मराठी तरुणांना रोजगार देणारा श्री गणेशमूर्तींच्या कारखान्यांचा उद्योग बंद करून मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका. यावर्षीही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (‘पीओपी’च्या) श्री गणेशमूर्तींना अनुमती मिळायलाच हवी. मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी मांडली.

मुंबई महापालिकेचा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींवरील बंदीचा निर्णय मान्य नाही ! – आमदार आशिष शेलार, अध्यक्ष, भाजप

मुंबई महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. गणेशोत्सव हा मुंबईतील महत्त्वाचा मोठा पारंपरिक उत्सव आहे.

‘पर्यावरणपूरक’ असा खोटा प्रचार करून प्रदूषणकारी कागदी लगद्यांच्या गणेशमूर्तींची केली जाते विक्री !

कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींवर बंदी असतांनाही त्याची उघडपणे राज्यात विक्री होते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

नाकर्तेपणावर मलमपट्टी 

सध्या ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवाच्या नावाने जो बागूलबुवा सिद्ध केला जात आहे, यावरून ‘जे जलप्रदूषण होते, ते जणू काही गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळेच होते’, असे चित्र निर्माण केले जात आहे.