‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे प्रमोशन न करण्याचा आमचाच निर्णय ! – अनुपम खेर, चित्रपट अभिनेता

आता खुद्द या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे, ‘‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रसिद्धी न देण्याचा माझा निर्णय होता. कारण हा ‘कॉमेडी शो’ (विनोदी कार्यक्रम) आहे आणि चित्रपटाचा विषय हा गंभीर आहे.’’

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित न करणार्‍या आगरा येथील चित्रपटगृहाच्या बाहेर राष्ट्रीय हिंदु परिषदेची निदर्शने

आगरा येथील संजय चित्रपटगृहाने चित्रपट प्रदर्शित न केल्याने परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी केली.

भिवंडी (ठाणे) येथील चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ बंद पाडल्याची चौकशी करावी ! – राम कदम, आमदार, भाजप

‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याची भाजपच्या आमदारांची विधानसभेत पुन्हा जोरदार मागणी ! ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्याविषयी सरकारची उदासीनता !

हिंदूंना त्यांच्या वेदना, अन्याय आणि अत्याचार जगासमोर सांगण्याचा अधिकार नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध !  – दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली

या राष्ट्राचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर होऊ नये; म्हणून हिंदू जागा झाला आहे. हीच गोष्ट हिंदुस्थानचे तुकडे करू पहाणार्‍यांना सहन होत नाही. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून जो कांगावा चालू झाला आहे, त्यावरून आपल्याला असे निश्चित म्हणता येईल.

दडपलेले सत्य उघड झाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले गोंधळले आहेत ! – पंतप्रधान

‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, ते समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आज विरोध करत आहेत.

इस्लामी टोळ्यांकडून काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेदच ! – अमेरिकेतील र्‍होड आइलँड संसदेची ठाम भूमिका

भारतातील काँग्रेस पक्ष काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाचे सत्य दडपतो, तर अमेरिकेतील एका राज्याची संसद काश्मिरी हिंदूंच्या बाजूने ठाम उभी रहाते. हे काँग्रेसला लज्जास्पद !

आमच्या विरोधात फतवा निघाला होता ! – ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकार आणि निर्मात्या पल्लवी जोशी

एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?

कोपरगाव (जिल्हा नाशिक) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट अखेर प्रदर्शित होणार !

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला जात नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘सुदेश पिक्चर पॅलेस’ या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे याविषयी जोरदार मागणी करून हा चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे.

वाई (जिल्हा सातारा) येथे चित्रपट प्रदर्शित करावा ! – भाजपची चित्रपटगृह व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे मागणी

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मीर येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारावर आधारीत सत्य परिस्थिती सांगणारा ज्वलंत ऐतिहासिक चित्रपट आहे. हा इतिहास भारतियांपासून लपवण्यात आला असून या इतिहासाची माहिती सर्वसामान्य जनतेला होणे आवश्यक आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे केली.