अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी १३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मागील २ मासांत राज्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. हे आर्थिक साहाय्य ३ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे.

गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ?

आजच्या लेखात गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ? याविषयीची सविस्तर माहिती येथे देत आहोत.

मसाला पिकांची (काळी मिरी आणि जायफळ यांची) लागवड कशी करावी ?

२९ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण आले, लवंग आणि दालचिनी यांच्या लागवडीविषयीची सूत्रे पाहिली. आजच्या लेखाद्वारे काळी मिरी आणि जायफळ यांची लागवड करण्यातील विविध टप्पे समजून घेऊया.

मसाला पिकांची (आले, लवंग आणि दालचिनी यांची) लागवड कशी करावी ?

आले, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि जायफळ या पिकांची नारळ अन् सुपारी यांच्या बागेत मिश्रपीक म्हणून लागवड करता येते. आजच्या लेखात आले, लवंग आणि दालचिनी यांच्या लागवडीविषयीची महिती येथे देत आहोत. 

कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना राज्यशासन ५० सहस्र रुपये प्रोत्साहन निधी देणार !

राज्यातील १३ लाख ८५ सहस्र शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी ५ सहस्र ७२२ कोटी रुपये इतका निधी व्यय करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

गोमूत्र आणि शेणखत यांद्वारे कांद्याचे विक्रमी उत्पादन !

माढा तालुक्यातील ढवळस येथील शेतकरी शहाजी पाटील यांनी शेतीत खत टाकतांना, तसेच फवारणी करतांना केवळ गो-उत्पादनांचा वापर करून अन्य रासायनिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या तुलनेत चांगले उत्पादन मिळवले आहे.

‘हळद’ या पिकाची लागवड कशी करावी ?

हळदीची योग्य वेळी लागवड, सुधारित वाणाचा (जातींचा) वापर, सेंद्रिय खतांचा भरपूर वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास निश्चितच शेतकर्‍यांना हळदीचे भरघोस उत्पन्न मिळण्यास साहाय्य होईल.

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे १०० गावांचा संपर्क तुटला !

जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील १०० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट तालुक्यात १७ जुलैच्या रात्रीपासून सर्वत्र ढगफुटीसदृश पावसामुळे २० गावांत पुराचे पाणी शिरले आहे.

भारताला मिळालेला धडा !

इराण आणि तैवान या देशांनी आसाममधून निर्यात केलेला सुमारे ४० सहस्र किलो चहा परत केला आहे. चहामध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशके असल्याचे कारण त्यांनी दिले. यामुळे भारतात ५३ टक्के चहाचे उत्पादन करणाऱ्या आसामच्या उत्पादकांची पुष्कळ हानी झाली आहे.

जाचक अटी रहित करून शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचे अनुदान द्या ! – आमदार आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्यात प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांच्या अनुदानासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी रहीत करून शेतकर्‍यांना थेट ५० सहस्र रुपये अनुदान देण्यात यावे, यांसाठी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, तसेच शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निवेदन दिले.