नंदुरबार येथे पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उद्ध्वस्त !

या शेतात अनुमाने ११३ किलोग्रॅम वजनाची ७ लाख ८६ सहस्र ३३१ रुपये किमतीची एकूण १५० गांजाची झाडे होती. या प्रकरणी पोलिसांनी शहादा पोलीस ठाण्यात गणेश भोसले  यांच्यावर गुन्हा नोंद केला असून सध्या ते पसार आहेत.

‘शेती’ शिक्षण : विकासासाठी आवश्यक !

महाराष्ट्रात लवकरच इयत्ता ५ वीपासून ‘शेती’ हा विषय शिकवला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील शाळेत शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही शेतकर्‍यांचीच मुले आहेत. ‘पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळत नाही.

अतीवृष्टीमुळे महाराष्ट्रातील पीडितत शेतकर्‍यांसाठी वाढीव दराने ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य !

अतीवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे एकूण २३ लाख ८१ सहस्र ९२० हेक्टर शेतीची हानी झाली असून २५ लाख ९३ सहस्र शेतकर्‍यांना अतीवृष्टीचा फटका बसला आहे. या पीडित शेतकर्‍यांसाठी ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य करण्यात येणार आहे.

८ दिवसांत होणार हानीचे पंचनामे ! – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पाठपुराव्याला यश

जालना जिल्ह्यातील मोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे झालेल्या हानीचे पंचनामे येत्या ८ दिवसांत करण्याचे निर्देश येथील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. यामुळे हानीग्रस्त बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

आच्छादन म्हणजे काय ?

‘भूमीच्या पृष्ठभागाला झाकणे’, म्हणजे ‘आच्छादन.’ मातीची सजीवता आणि सुपिकता टिकवून ठेवण्याचे कार्य आच्छादन करते.

‘सेंद्रिय शेती’ म्हणजे ‘नैसर्गिक शेती’ नव्हे !

नैसर्गिक शेतीमध्ये झाडांसाठी उपयुक्त अशा सूक्ष्म जिवाणूंचे संवर्धन करण्यावर भर देण्यात येतो. या पद्धतीमध्ये खर्च नगण्य आणि उत्पन्न भरपूर असते. यासाठी सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेमध्ये नैसर्गिक शेतीविषयीची माहिती दिली जाते.

पुणे जिल्ह्यातील सधन शेतकर्‍यांनी लाटले अल्पभूधारकांचे अनुदान !

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत अल्प भूधारक शेतकर्‍यांना देण्यात येणारा लाभ (अनुदान) प्राप्तीकर भरणार्‍या शेतकर्‍यांनी घेतला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शेतकर्‍यांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

जिल्ह्यातील गंगापूर आणि संभाजीनगर येथील शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांकडून गंगापूर-वैजापूर मार्गावर मांजरी फाटा येथे २१ ऑगस्ट या दिवशी १ घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले आहे.