हिंदूंच्या मंदिरांचा निधी धर्मासाठी खर्च व्हावा !
पूरग्रस्तांच्या साहाय्य निधीसाठी केरळच्या गुरुवायूर मंदिराकडून प्राप्त झालेले १० कोटी रुपये मंदिराला परत करण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.
पूरग्रस्तांच्या साहाय्य निधीसाठी केरळच्या गुरुवायूर मंदिराकडून प्राप्त झालेले १० कोटी रुपये मंदिराला परत करण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.
भारतात ‘अॅपल’चे आयफोन बनवणारे आस्थापन ‘विन्ट्रॉन कॉर्पोरेशन’च्या कारखान्यावर झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणी साम्यवादी विद्यार्थ्यांची संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’चा स्थानिक अध्यक्ष कॉम्रेड श्रीकांत याला अटक करण्यात आली आहे.
‘बिग बॉस’मध्ये केवळ भांडणे, मारामारी, राजकारण आणि अश्लील भाषेत केलेले संभाषण पहायला मिळते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून मनोरंजन होत नाही, तर केवळ मानसिक त्रास होतो, असे विधान अभिनेत्री शमिता शेट्टी यांनी एका मुलाखतीत केले आहे.
भारतातील असहिष्णुतेत गेल्या २ वर्षांत वाढ झाली असून देश मुसलमानांसाठी ‘धोकादायक आणि हिंसक’ झाला आहे, असे मत ‘दक्षिण आशिया स्टेट ऑफ मायनॉरिटीज’ या अहवालात मांडण्यात आले आहे.
भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर कुणाचाही अधिकार नाही. भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही आहेत. आम्ही रामभक्त आणि कृष्णभक्त आहोत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले.
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे एका प्राचीन शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करतांना गावकर्यांना मंदिराच्या गर्भगृहामध्ये सापडलेले ५६५ ग्राम सोने सरकारी अधिकार्यांनी सरकार जमा केल्याने गावकरी ते परत मिळवण्यासाठी चळवळ राबवत आहेत.
भारतातील कृषी कायद्यांचा विरोध करतांना भारतविरोधी गटाने वॉशिंग्टन (अमेरिका) येथील भारतीय दूतावासासमोर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्यावर खलिस्तानी झेंडा टाकून त्याद्वारे गांधींचा तोंडवळा झाकून टाकला.
केरळच्या मलप्पूरम् या मुसलमानबहुल जिल्ह्यातील वन्नियामबलम् मंदिरात बूट घालून प्रवेश केल्याच्या प्रकरणी हिजाब घातलेल्या एका महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोपिया जिल्ह्यात आतंकवाद्यांना पळून जाण्यास साहाय्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते अधिवक्ता गौहर अहमद वानी यांना अटक केली आहे.
कर्नाटकच्या विधानसभेत गोहत्येवर बंदी आणणारे विधेयक संमत करण्यात आले. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला.